अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी सुखद बातमी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :

आज जिल्ह्यातील सात कोरोनाग्रस्त आजारावर मात करून घरी परतले आहेत. या सर्वाना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला.

या रुग्णांमध्ये संगमनेर ४, राहाता २ आणि नगर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यातील करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता झाली २१३ झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

तसेच अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६२ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून

त्यापैकी ३१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. उर्वरित अहवालाची प्रतीक्षा आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24