श्रीगोंदे तालुक्यातील नागरिकांसाठी सुखद बातमी!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यात रविवारी कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. तालुक्यातील २१ गावांनी कोरोना पूर्णपणे रोखला आहे.

कोरोनाचा पहिला रुग्ण १० मार्चला तपासण्यात आला, पण तो निगेटिव्ह निघाला. २५ जूनला ११९ रुग्णांपैकी आठ पॉझिटिव्ह आले. कोरोना रुग्णांची संख्या ३१ ऑक्टोबरला २२०२ वर गेली.

१ नोव्हेंबरला तालुक्यात प्रथमच एकही रुग्ण आढळला नाही. खऱ्या अर्थाने हा श्रीगोंदे तालुक्यासाठी सुवर्ण दिन म्हणावा लागेल,

अशी प्रतिक्रिया कोरोनाची अद्यावत आकडेवारी ठेवणारे प्रा. तुकाराम दरेकर यांनी व्यक्त केली. आतापर्यंत तालुक्यातील ११५ पैकी ९४ गावांत २१८९ कोरोना रुग्ण आढळले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24