खूशखबर! कोरोनावर 100% प्रभावी असा ‘हा’ उपाय सापडला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत.

रशियाने आपली लस लॉन्च केली आहे. तर भारतात ‘सीरम इन्स्टिटयूट’, ‘झाइडसकॅडिला’ आणि ‘भारतबायोटेक’ या तीन कंपन्यांकडून कोरोनाची लस तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु अद्याप प्रभावी अशी लस बाजारात उपलब्ध नाही.

आता अमेरिकेतच्या शास्त्रज्ञांनी एक थेरेपी तयार केली आहे. कोरोनाव्हायरसवर ही थेरेपी 100 टक्के प्रभावी ठरेल असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

फ्लोरिडामधील एडवेंटहेल्थ रुग्णालयातील डॉक्टरांनी हे केलं असून ICAM असं या थेरेपीचं नाव आहे. चार प्रकारचे औषध एकत्र करून एक थेरेपी तयार केली आहे.

एका मीडियाने fox35orlando.com रिपोर्टचा हवाला देत हे वृत्त दिलं आहे. सध्या याचं क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. जर ही सुरक्षित आणि प्रभावी ठरली तर रुग्णालयात दाखल न करतादेखील कोरोना रुग्णांवर उपचार करता येतील, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.

 काय आहे ही थेरपी? :- आधीपासून वापरात असलेल्या चार औषधांची एक थेरेपी तयार करण्यात आली आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि झिंकसारखे इम्युनोसपोर्ट औषधं, कोर्टिकोस्टेरॉईड्स, अँटिकोगलंट्स आणि मॅक्रोलाइड्स यांचा समावेश आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या उद्देशाने ही थेरेपी तयार करण्यात आली आहे. हे औषध रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवण्यासह फुफ्फुसाला येणाऱ्या सूजेपासूनही संरक्षण करेल. .

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24