खुशखबर ! ‘या’ व्यक्तींना अर्ध्या किंमतीत मिळणार एअर इंडियाचे तिकिट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-देशातील कोणत्याही ६० वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला आता एअर इंडियाचे तिकिट निम्म्या दरात मिळणार आहे. विमानोड्डाण मंत्रालयाने बुधवारी याची माहिती दिली आहे.

एसटी, रेल्वे नंतर आता चक्क विमानातही ज्येष्ठ नागरिकांना हाफ तिकीटात प्रवास करता येणार आहे. केंद्र सरकारनं ज्येष्ठ नागरिकांना हे गिफ्ट दिलं आहे.

विमानाचा प्रवास महागडा असल्यानं सामान्य नागरिक त्यानं प्रवास करत नाहीत, मात्र, हा प्रवास वेळ वाचवणारा आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना याची सर्वाधिक गरज आहे.

या निर्णयामुळे यापुढे आता एअर इंडियाचे तिकिट देशातील कोणत्याही 60 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला निम्म्या किंमतीत मिळणार आहे.

यासाठी अशा असणार आहे अटी :-

  • प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाकडे भारतीय नागरिकत्व हवे.
  • भारतात स्थायिक असलेल्या नागरिकांचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असायला हवे.
  • इकॉनॉमी केबिनमध्ये बुकिंग श्रेणीच्या मूळ भाड्याचे 50 टक्के
  • भारतात कोणत्याही सेक्टरच्या प्रवासासाठी लागू
  • तिकिट जारी केल्याच्या 1 वर्ष मुदतीसाठी लागू
  • प्रवासाच्या सात दिवस आधी बुकिंग करावे लागेल

एअर इंडियानं यापूर्वी स्किमची घोषणा केली होती. मात्र आता उड्डयन मंत्रालयानंच त्याला मान्यता दिलीय. केंद्र सरकार एअर इंडियाचं खासगीकरण करणार आहे, आणि कंपनीची 100 टक्के भागीदारी विकणार आहे.

त्यासाठी टाटा ग्रूपनंही बोली लावली आहे. त्यातच तोटा कमी करण्याचा आणि एअर इंडियाच्या प्रवाशांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न सरकार करतं आहे. हेच पाहता आता सरकारनं ज्येष्ठ नागरिकांना ही सवलत देऊ केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24