अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आलेले अपयश, लॉकडाऊनमुळे शेतकरी, शेतमजुरांचे होत असलेले हाल लक्षात घेता त्यांच्यासाठी ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे अशा मागण्या करत शुक्रवारी भारतीय जनता पार्टी,श्रीरामपूर शहरच्या वतीने महाविकाअघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत अधिकाधिक नागरिकांची टेस्ट केली जावी, अशी मागणी करूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र बचाओ आंदोलनाची हाक दिली.
शेतकरी, शेतमजूर, गोरगरिबांना या सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमाल विक्रीची कोणतीही व्यवस्था सरकारने केलेली नाही. यावेळी शहर भाजपाच्या वतीने हातात काळे झेंडे, तोंडाला काळा मास्क लावून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी श्रीरामपूर शहर भाजपाचे नेते गणेश राठी, मा. शहराध्यक्ष मारुती बिंगले, विलास थोरात, राजेंद्र कांबळे, बाळासाहेब अहिरे, गणेश अभंग, संदीप सातपुते, संदीप विश्वंभर भाजप युवा मोर्चाचे अक्षय वर्पे, विशाल यादव, रवी पंडित, रुपेश हरकल, अमोल अंबिलवादे आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com