अहमदनगर Live24 टीम,12 ऑगस्ट 2020 :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ शनिवार, दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे.
या दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 या दरम्यान इतर कोणत्याही शासकीय अगर निमशासकीय कार्यालयांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करु नये.
जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 वाजेच्या पूर्वी किंवा 9.35 वाजेच्या नंतर आयोजित करावा, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सामुदायिक देशभक्तीपर गीतगायन, वाद विवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा/देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धा, एखाद्या विषयाचा वेबीनार अशा कार्यक्रमांचे अंतर्भाव असलेले खास कार्यक्रम शाळा व महाविद्यालयांमार्फत ऑनलाईन पध्दतीने आयोजित करावे.
स्वातंत्र्य दिनाचा 73 व्या वर्धापन दिनानिमित्त प्लास्टिकचे झेंडे न वापरण्याबाबत तसेच कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये सामाजिक अंतर ठेऊन.
व याबाबतच्या सर्व नियमांचे पालन करण्याबाबत तसेच प्रत्येकाने चेहऱ्यावर मास्क परिधान करणे अनिवार्य आहे.
यासंदर्भातील पूर्वनियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निर्देशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी विविध विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्व विभागांना त्यांच्या जबाबदारीचे वाटप केले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved