अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथे ६२ हजार ४०० रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त करत एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. बुधवारी सकाळी आश्वी पोलिसांनी ही कारवाई केली.
आश्वीतील उंबरी रोडवरील मोमीनपुरा गल्लीत अवैध गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळ गाठत पथकाने कारवाई केली असता गुटखा मिळाला.
ताब्यात घेण्यात आलेल्या हमीद शेखने निमगावजाळीच्या संतोष डेंगळेचा हा गुटखा असल्याचे सांगितले. डेंगळे व शेख यांच्यावर अन्न सुरक्षा व मानके कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.