अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : एकीकडे जिल्हाभर कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे मात्र राहुरी तालुका पुन्हा तूर्त कोरोनामुक्त झाला आहे.
तालुक्यात बाहेरून दाखल झालेल्या दोन्ही कोरोनाबाधित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले, त्यामुळे तालुका कोरोनामुक्त झाला आहे.
गत १० दिवसांपासून ग्रामीण भागात आरोग्य विभागाची ९० पथके, तर शहरी भागात १० पथके घरोधर जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करीत आहेत, दीड लाखांच्या दरम्यान तपासणी पूर्ण झाली आहे.
नगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. पुणे, मुंबई व इतर परिसरातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढताच कोरोना रूण संख्येतही झपाट्याने वाढ झाली आहे.
दरम्यान, राहुरी परिसरात बांबोरी येथे कल्याण (चेंबूर) येथून आलेला तरूण कोरोना बाधित झाला होता. त्यानंतर घाटकोपर येथून थेट नगर येथे एका खासगी रुणालयात दाखल झालेली टाकळीमिया (ता.राहुरी) येथील महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता.
दोन्ही बाहेरून आलेल्यामुळे राहुरी तालुक्यात दोन रुग्णांची नोंद घेण्यात आली होती. दरम्यान, लोणी (ता. राहता) येथील कोरोना बाधिताशी संपर्कात आलेल्या ६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
प्रशासन सतर्क असताना नागरीकांनी देखील सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार फसियोद्दीन शेख व आरोग्य अधिकारी डॉ. नलिनी विखे यांनी केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews