प्रेमाच्या आणाभाका घेऊनही ‘त्याने’ ‘तिला’ फसविले! अखेर प्रेयसीने संपविली जीवनयात्रा!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वसाहतीत आपल्या आत्याकडे राहत ‘त्या’ तरुणीचं जामखेड तालुक्यातल्या जवळे येथे असलेल्या अहमदनगर जिल्हा बँकेच्या शाखेत कॅशियर असलेल्या विवाहित प्रियकरावर मोबाईलवर सूत जुळले.

प्रेमात आंधळ्या झालेल्या ‘त्या’ तरुणीने त्याचे चारित्र्य असे काहीच न पाहता त्याच्या खोट्या प्रेमाचा तिने स्विकार केला. धनंजय विष्णुपंत कांबळे असे

त्या खोटारड्या प्रियकराचे नाव असून अर्थात विवाहित असूनही त्याने ‘मी अविवाहित असून आपण लग्न करु’ असे सांगत प्रेमाच्या खोट्या खोट्या ‘आणाभाका’ घेतल्या,

तिला प्रेमाच्या गुलाबी जाळ्यात ओढले. शारिरीक संबध ठेवण्यासाठी तो दर सुट्टीत त्याचा भाऊ विजय कांबळे यांच्याकडे श्रीगोंद्याला येत होता. विजय कांबळे हा त्याची मुलगी राहत असलेल्या वसाहतीत राहत आहे.

यानंतर सदर या तरुणीला धनंजय हा विवाहित असल्याचे समजले. त्याने लग्नास दिला, नंतर त्याने तिला वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, प्रियकराकडून फसवणूक झाल्याने आलेल्या नैराशातून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील शासकीय वसाहतीत दि. २४ जुलै रोजी दुपारी घडली.

मात्र या पिडीत तरुणीवर शनिवारी पहाटे उपचार सुरु असताना मृत्यू झाला. याप्रकरणी तरुणीचा प्रियकर धनंजय विष्णुपंत कांबळे (रा. करमाळा, जि. सोलापूर), विजय विष्णूपंत कांबळे आणि विजयची पत्नी यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24