अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.
काल आलेल्या अहवालानुसार श्रीरामपूर शहरात पुन्हा एका ठेकेदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अद्याप 24 जणांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे आता श्रीरामपूर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा 43 वर जावून पोहोचला आहे.
सदर रुग्णाने त्याचा मोबाईल नंबर व पत्ता खोटा दिल्यामुळे हा रुग्ण कुठला आहे याची माहिती मिळण्यास प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली.
चौकशीनंतर ही व्यक्ती ठेकेदार असल्याची माहिती असून तो वॉर्ड न. 7 मधील दळवी वस्ती परिसरात राहत असल्याचे समजले. या ठेकेदाराच्या मुलीचा विवाह येथील एका मंगल कार्यालयात नुकताच झाला होता.
त्या विवाहासाठी जळगावचे वर्हाडी आले होते. त्यानंतरच या व्यक्तीला त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर या व्यक्तीचा स्त्राव तपासणीसाठी पाठविला असता तो कोरोना पॉझिटिव्ह आल्याने इतरांची धाकधुकी वाढली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews