अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- मित्रांसोबत क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी गेलेल्या तरुणाचा सामना खेळून परत येत असताना मोटरसायकलच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. तर इतर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना कर्जत तालुक्यातील महिजळगाव येथे घडली. रोहित (पांडू) मधुकर शिंदे (रा.चापडगाव) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चावडगाव येथील रोहित (पांडू) मधुकर शिंदे हा करमाळा येथील मित्रांसोबत रोहित आष्टी येथे क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता.
क्रिकेट खेळून परत येत असताना माहीजळगाव येथे नगर-सोलापूर हायवेवर असलेल्या
शेवाळे यांच्या पेट्रोलपंपा जवळ करमाळ्याकडून येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली.
या भीषण अपघातात रोहित त्याचा मृत्यू झाला. तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
शांत आणि मनमिळाऊ स्वभावाच्या रोहितच्या मृत्यूने चापडगाव सह परिसरात शोककळा पसरली आहे.