अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी बेताल वक्तव्य करून आपला मूर्खपणा जनतेसमोर उघड केला आहे.
शरदचंद्रजी पवार यांच्यावर टीका करण्याची पडळकर यांची लायकी नाही, त्यांनी पवार साहेबांची माफी मागावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.
पद्मविभूषण खासदर शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा शहर राष्ट्रवादीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. त्यावेळी जगताप बोलत होते.
यावेळी विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, सुमित कुलकर्णी, जॉय लोखंडे, गजानन भांडवलकर आदी उपस्थित होते. जगताप म्हणाले, आदरणीय शरदचंद्रजी पवार हे देशाचे आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे.
देशावर, राज्यावर आलेल्या संकटाच्या काळात त्यांनी सक्षमपणे भूमिका मांडून संकटातून बाहेर काढण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पवारसाहेबांची त्यांनी केलेल्या विविध कामांबद्दल देशातील जनतेसमोर स्तुती केली. ५० वर्षे त्यांचे देशाच्या व राज्याच्या विकासामध्ये योगदान आहे. पवारसाहेबांनी कधीच जातीपातीचे राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन काम केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews