अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मागील भांडणाच्या कारणावरून एकाने रिक्षा वर ज्वलनशील पदार्थ टाकुन पेटवुन दिली. ही घटना बोल्हेगाव येथील राम मंदिराशेजारी मंगळवारी (दि.10) पहाटे 3 च्या सुमारास घडली.
याबाबतची माहिती अशी की, तृप्ती संतोष कातोरे (रा. रेणुकानगर, एमआयडीसी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या वडिलांनी चालविण्यासाठी घेतलेली रिक्षा (क्र. एम एच 16 क्यु 8271)
ही रात्री घरासमोर लावलेली असताना शंकर बबन जारड (रा. बोल्हेगाव गावठाण, राम मंदिरजवळ) याने मागील भांडणाचा राग मनात धरून पहाटेच्या सुमारास रिक्षावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकुन ती पेटवुन दिली.
आगीत रिक्षा पुर्ण जळुन खाक झाली.या प्रकरणी तृप्ती कातोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी भारतीय दंड विधान कायदा कलम 435 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com