अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :- श्रीरामपूर दत्तनगर येथील पोलिस चौकीसमोर अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतलेल्या नदीम पठाण या तरुणाची प्राणज्योत गुरुवारी मालवली.
त्याला त्रास देणाऱ्या पोलिसावर कारवाई करावी, तरच मृतदेह ताब्यात घेऊ, असा पवित्रा नदीमच्या आईने घेतल्याने पेच वाढला.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी नातेवाईकांनी दर्शवली. रमजान ईदच्या दिवशी नदीमने पेटवून घेतले.
पोलिसाच्या त्रासामुळे त्याने आत्मदहन केल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. दोषी पोलिसाविरुद्ध गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
शुक्रवारी आमदार लहू कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, ज्ञानेश्वर मुरकुटे, सचिन गुजर, अहमद जहागीरदार, बाबासाहेब दिघे, इस्माईल सय्यद, भीमराज बागूल, राजाभाऊ कापसे यांनी नदीमच्या घरी भेट देऊन चौकशी करून कारवाईची मागणी पोलिसांकडे केली.
नदीमची प्रकृती चिंताजनक असल्याने मृत्यूपूर्व जबाब पोलिसांना घेता आला नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही.
नदीम व त्याच्या पत्नीचा वाद व्हायचा. त्याची पत्नी तीन वर्षांपासून माहेरी होती. तिने नदीमच्या विरोधात पोलिसात तक्रार अर्जही केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com