पाय घसरून बंधाऱ्यात पडला आणि जीवाला मुकला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-  पुलावरून पाय घसरून बंधाऱ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे घडली आहे. या दुर्घटनेत जगन्नाथ दामू सानप (वय ६५ रा. पिंपळे) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

याबाबत मारुती आंधळे यांनी पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली आहे. यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, जगन्नाथ दामू सानप हे पिंपळे येथून

आपल्या घरून दि. १३ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारस गावात देवदर्शनावरून घरी परतत असताना गावानजीक असणाऱ्या पुलावरून पायी जात असताना पुलाला कठाडे नसल्याने त्यांचा तोल जाऊन बंधाऱ्यातील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

हा प्रकार दि. १४ रोजी सकाळी १० वाजता गावाशेजारील बंधाऱ्यात पाण्यामध्ये काहीतरी तरंगत असल्याचे दिसून आले. त्यावर शहानिशा केली असता हा मृतदेह जन्नाथ सानप यांचा असल्याचे लक्षात आले.

गावकऱ्यांच्या मदतीने हा मृतदेह घुलेवाडी येथे उत्तरणीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. घुलेवाडी पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24