Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

ज्यूसमधून गुंगीचे औषध देवून अत्याचार करणारा ‘तो’ आठ तासाच्या आत जेरबंद!

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  एका तरूणीला ज्यूसमधून गुंगीचे औषध देवून नंतर तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एकास कोतवाली पोलिसांनी अवघ्या आठ तासांतच घारगाव शिवारातून जेरबंद केले आहे.(Ahmednagar City News)

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

राहुल शिवाजी वाकळे असे त्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, एका तरुणीशी ओळख करून तिचा विश्वास संपादन केल्यानंतर तिला ज्युस मधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नगर शहरात घडली होती.

याप्रकरणी कोतवाली पोलिसात संगमनेरमधील एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान याबाबत तपास करत असताना कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना राहुल वाकळे हा घारगाव परिसरामध्ये लपून बसल्याची माहिती कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना मिळाली होती .त्यानुसार त्यांनी ही कारवाई केली.