अहमदनगर Live24 :- राहुरी तालुक्यातील तहाराबाद येथील वाळू वाहतूक करतांना पकडलेला ट्रॅकटर सोडण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी करणारा तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला आहे.
अशोक रामचंद्र थोरात असे आरोपीचे नाव असून दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. तक्रारदार यांचे मालकीचे ट्रॅक्टर वाळू वाहतूक करताना आरोपी लोकसेवक यांनी रविवारी पकडले होते.
सदर ट्रॅक्टरवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता सदर ट्रॅक्टर सोडण्यासाठी तक्रारदार यांचेकडे तलाठी अशोक थोरात यांनी ५०, 000 रुपयेची मागणी करुन दिनांक 26 एप्रिल रोजी 40000 रुपये स्विकारले व आरोपी लोकसेवक यांनी आज उर्वरित १०,000 रुपये पंचासमक्ष मागणी करुन स्वीकारले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®