बस झालं आता कीर्तन सोडून शेती करतो – इंदुरीकर महाराज

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असलेले इंदुरीकर महाराज त्यांच्या विधानांमुळे उठलेल्या वादंगामुळे व्यथित झाले आहेत. वादामुळे मला खूप त्रास होत आहे.

एक दोन दिवस बघेन आणि कीर्तन सोडून शेती करेन,’ अशी प्रतिक्रिया इंदुरीकर महाराज  यांनी दिली आहे. इंदुरीकर म्हणाले, “यूट्यूबवाले आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. इंदुरीकर संपवायला निघालेत. मी कशात सापडेना म्हणून मला गुंतवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दोन-अडीच तासाच्या कीर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं.” मी बोललेलो वाक्य चुकीचं नसून अनेक ग्रंथात नमूद आहे. वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि कीर्तन सोडून शेती करेन, असे ते म्हणाले.

‘ते’ वादग्रस्त विधान : ‘समतिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा आणि विषमतिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगी अपत्य प्राप्त होते’, असं विधान इंदुरीकर महाराजांनी केलं होतं, तसेच त्यासाठी भागवत, ज्ञानेश्वरीत या ग्रंथाचे दाखलेही दिले होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24