दंड वाचवण्यासाठी दुचाकी चालकाने हेल्मेटसोबत केले असे काही….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

वडोदरा : वाहतूक नियमांचे पालन होण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड आकारला जात आहे. मात्र, सध्या एक व्हिडिओ सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. 

यात एक ५० वर्षीय दुचाकी चालक हेल्मेटवरच सर्व कागदपत्रे चिकटवून प्रवास करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.. दुचाकी चालकाचे रामपाल शाह असे नाव असून, ते इन्शुरन्स एजंट आहेत. त्यांच्या मालकीची रॉयल एनफिल्ड आहे. सध्या वाहतूक पोलीस वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास मोठ्या प्रमाणात दंड करत आहेत.

त्यामुळे त्यांनी सर्व कागदपत्रे हेल्मेटवरच लावून प्रवास करायचा, असे ठरवले. वाहनचालक परवाना, पीयूसी, आरसी बुक आणि विमा पॉलिसी आदी गाडीची कागदपत्रे त्यांनी हेल्मेटवरच चिटकवलेली दिसतात. अनेक वाहन चालकांकडे कागदपत्रे असतात. मात्र, अधिक जण ते घरी विसरतात, त्यामुळे दंड भरावा लागतो. जर मीही घरी कागदपत्रे विसरलो तर मला हा मोठा दंड भरावा लागेल. 

त्यामुळे मी शक्कल लढवली असल्याचे शाह यांनी सांगितले. दुचाकी घेऊन निघालो की हेल्मेट घालतोच. आता तर हेल्मेटसोबतच सर्व कागदपत्रेही सोबत असतात. रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी अडवले तर मी त्यांना हेल्मेटवर लावलेली कागदपत्रे दाखवतो, असे शाह म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24