अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- सध्या राज्यात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
शेवगाव तालुक्यातही जोरदार पाऊस झाला असून तालुक्यातील आव्हाणे, अमरापूर, वाघोली, ढोरजळगाव, भातकुडगाव, सामनगाव या परिसरातील गावांमध्ये दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने
शेतातील सखल भागात पाणी साचल्याने खरिपातील बाजरी, तूर, मूग, कपाशी, सोयाबीन ही पिके पाण्याखाली गेली आहेत. गुरुवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे डोमेश्वर नाला, सकुळा, अवनी, नंदिनी व ढोरा नद्या वाहत्या झाल्या.
वाघोली परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे माका, शिंगवे, दातीरवस्ती कडे जाणारे रस्ते वाहून गेले असून ते दुरुस्त करण्याची व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
तालुक्यात मंडलनिहाय झालेला पाऊस (गुरुवार) (मिलीमीटर मध्ये) शेवगाव- 76 , ढोरजळगाव-51 , भातकुडगाव-57 , एरंडगाव-25, चापडगाव-३६, बोधेगाव-31
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com