अहो ऐकलत का ? कांद्याला मिळतोय इतका बाजारभाव !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पारनेर :- जुन्या कांद्याचा साठा संपत आल्याने राज्याच्या बहुतांश भागात घाऊक आणि किरकोळ बाजारात   उच्चांकी दर मिळत आहे.दिवसेंदिवस कांद्याच्या दरात वाढ होत आहे 

दरम्यान पारनेर बाजार समितीत बुधवारी झालेल्या लिलावात जुन्या कांद्याला १३ हजार रुपये प्रति क्विंटल, तर नवीन कांद्याला साडेबारा हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

काही दिवसांपासून कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत. जिल्ह्यातील नगर, पारनेर, कोपरगाव, घोडेगाव, वांबोरी बाजार समितीत कांद्याने शंभरी पार केली असून.

बुधवारी पारनेर बाजार समितीत कांदा लिलाव घेण्यात आले, या वेळी सहा हजार कांदा गोण्यांची आवक झाली होती.

लिलावात जुन्या कांद्याला सरासरी १३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला; तसेच नवीन कांद्याला नऊ हजार ते १२ हजार ५५० रुपये, २ नंबर कांद्यास ६ हजार ते ९ हजारापर्यंत भाव मिळाला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24