जिल्ह्यातील ‘हे’ नेते म्हणाले महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येईल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार येत्या डिसेंबर महिन्यापर्यंतच टिकेल. त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येईल, असा दावा भाजप नेते शिवाजी कर्डिले यांनी केला आहे.

महाविकासआघाडीचे सरकार पुढची पाच वर्षे सोडा, किती काळ टिकेल, हे आता जनताच सांगेल. हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. पण महाविकासआघाडीचे सरकार फार तर डिसेंबर महिन्यापर्यंत टिकेल. त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येईल, असे भाकीत कार्डिले यांनी वर्तविले.

काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसशासित नगरपालिकांना निधी देत नसल्याची खंत बोलून दाखविली होती. तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत जाण्यास कसे उत्सुक नव्हते, या आठवणीलाही त्यांनी उजाळा दिला होता.

त्यामुळे महाविकासआघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळाले होते. एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेशानंतर कर्डीले यांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चा नगर जिल्ह्यात सुरू आहे. यावर शिवाजी कर्डिले यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, मला भाजप सोडून कुठल्याही पक्षात जायचं नाही. तसेच माझ्याकडे कोणी संपर्क केला नाही आणि त्याची मला गरज नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24