अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-दोन गावठी कट्टे व अकरा जिवंत राउंड बाळगणाऱ्यास पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याचा मुलगा मात्र फरार झाला.
सलाबतपूर येथील विलास काळे (वय ६५) कट्टा घेऊन गावात फिरत आहे, अशी माहिती मिळताच प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक अभिनव त्यागी, सहायक निरीक्षक भरत दाते, पोलिस नाईक राहुल यादव, महेश कचे, अशोक कुदळे, गणेश इथापे, श्याम गुंजाळ, सचिन गणगे यांच्या पथकाने तेथे जाऊन विलास श्रीपती काळे यास ताब्यात घेतले.
त्याच्याकडे ८० हजार किमतीचे दोन गावठी कट्टे, तसेच साडेपाच हजार किमतीची ११ जिवंत काडतुसे मिळाली.हे दोन्ही कट्टे विलास काळे याचा मुलगा पाल्या काळे याने खरेदी केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. तो मात्र फरारी आहे. विलास काळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीकडून आणखी गावठी कट्टे मिळण्याची शक्यता आहे.फरार आरोपी पाल्या विलास काळे याच्यावर नेवासे व गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved