अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्याने कालवड, बैल, मेंढ्या शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे.
त्यामुळे शेतकर्यांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कधी एकदाचा बिबट्या पिंजर्यात जेरबंद होईल याकडे शेतकर्यांचे लक्ष लागून आहे.
नुकतेच बिबट्याच्या भीतीने राहाता तालुक्यातील शेतकरी भयभीत झाला आहे. राहाता तालुक्यातील राजुरी व परिसरातील अनेक भागांमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार सुरू असून काही शेतकरी व शेतमजुरांना शेतात जाणेही मुश्कील झाले आहे.
शेताच्या कडेला दोन बिबटे कायम दिसत असून ते या भागात मुक्तपणे संचार करत आहेत. त्यामुळे चारा काढणे किंवा शेतीतील पाणी भरणे, मशागत करणे या कामासाठी कोणीही शेताकडे जाण्यासाठी धजत नाही. वन अधिकार्यांनी या ठिकाणी पाहणी करून पिंजरे लावावेत, अशी मागणी या भागातील शेतकरी वर्गणी केली आहे.