अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक गावात तीन महिने काटेकोरपणे लॉकडाऊनचे पालन यशस्वी करण्यात आले,
परंतु अनलॉक सुरू होताच एका तरुणाच्या हलगर्जीपणामुळे तीन महिन्यांचे प्रयत्न निष्फळ ठरून येथील करोना बाधितांची संख्या आता ४ वर गेल्याने संपूर्ण गाव चिंताग्रस्त बनले आहे.
येथील २३ वर्षीय करोना बाधित रुग्ण चंद्रापूर येथील बाधिताच्या संपर्कात आला होता. त्याचा अहवाल काल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेले ३१ जणांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी हलविण्यात आले होते.
पैकी १४ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्हमध्ये बाधिताच्या आईचा समावेश असून उर्वरित दोघेजण त्याच गल्लीतील रहिवासी आहेत. त्यामुळे दाढ येथील करोना बाधितांची संख्या आता ४ वर गेली आहे,
अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीपाद मैड यांनी दिली. करोना बाधितांचा आकडा वाढत चालल्याने संपूर्ण दाढ बुद्रुक गाव हादरून गेले आहे.
तहसीलदार कुंदन हिरे यांच्या आदेशानुसार दाढ बुद्रुक ग्रामपंचायतीने संबंधित परिसर अगोदरच कंटेन्मेंट झोन घोषित करून सील केला आहे.
सदर तरुणाचा वावर तेली गल्ली, सोनार गल्ली, सुतार गल्ली, मुस्लिम गल्ली येथे असल्याने हा परिसर १४ दिवसांसाठी सील करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews