मुलीला पळवून नेण्याच्या वादातून मारहाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- नगर तालुक्यातील हातवळण येथे मुलीला पळवून नेण्याच्या वादातून पाच जणांनी एकाला मारहाण केली आहे.

याप्रकरणी पाच जणांविरुद्ध मारहाण करणे, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अंबादास सोन्याबापू जगताप (रा. मठपिंप्री, नगर) यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब रंगनाथ मेटे, सुमीत भानुदास जपे, दत्तात्रय कारभारी जपे, सागर दत्तात्रय जपे, सचिन कारभारी जपे (रा. हातवळण) यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गावातील एका तरुणाने मुलीला पळवून नेले आहे. त्यातून वाद झाले होते. त्यावेळी मठपिंप्री येथील अंबादास जगताप हे चारा छावणीमध्ये गेले.

त्या वेळी वाद होऊन जगताप यांना पाच जणांनी काठ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24