मोटारसायकलची डंपरला धडक; दुचाकीस्वार ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :   कोपरगाव येथील झगडे फाट्याकडून पुणतांबा चौफुलीकडे जाणारी मोटरसायकल (क्रमांक एमएच-17 बी.एच. 8665 ) वरील भाऊसाहेब सखाराम केदार यांची मोटरसायकल डंपरवर आदळून अपघात झाला.

यामध्ये ते जागीच मयत झाले आहेत. हा अपघात हॉटेल माइल स्टोन समोर, कोपरगाव हद्दीतील डाऊच खुर्द शिवारात रात्री आठ वाजेच्या सुमारास झाला. या भीषण अपघातात उभ्या डंपरला धडक दिल्याने भाऊसाहेब सखाराम केदार (54), (रा. गाभणवाडी मुक्काम पोस्ट चंदनापुरी तालुका संगमनेर.) याचा मृत्यू झाला.

गुरुवारी (20) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास माईल स्टोन हॉटेल समोर आरोपी याने आपले ताब्यातील डंपर क्रमांक एम एच 14 सीपी 6534 ड्रायव्हर साईडचे चाक पंचर/ नादुरुस्त झाले नंतर वाहन रोडचे खाली सुरक्षित न लावता धोकेदायक परिस्थितीत रोडवर लावले.

कोपरगाव येथील झगडे फाटा ते पुणतांबा चौफुली रोडवर उभ्या डंपरला दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. डंपर चालकांविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहनाचे पाठीमागील भागात पार्किंग लाइट, इंडिकेटर लावला नाही व वाहनाचे मागील भागात सुरक्षित अंतरावर वाहन नादुरुस्त आहे. याबाबतचे निशाणी लावली नाही. अडथळा उभा केला नाही.

……………………………………………………………………..
जाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले अमृततुल्य या नामांकित चहाची सद्यस्थितीत तयार असलेली फ्रेंचायसी देणे ( विक्री ) साठी उपलब्ध आहे .
पत्ता :- प्रेम धन चौक महेंद्र पेढे वाला च्या समोर अहमदनगर
पहा फोटोज व लोकेशन पुढील लिंकवर https://bit.ly/3ggsEbn
फ्रेंचायसी साठी संपर्क :- आदि एन्टरप्रायजेस 9730197997, 9764855522, 9975167374
……………………………………………………………………….

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24