भयानक…नगरमधील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता, व्यापार्‍यांकडून काळाबाजार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोचे रूग्ण वाढत असल्याने रूग्णालयांमध्ये ऑक्सिजनची मागणी चौपट वाढली आहे. 

परंतु, नगरमधील हॉस्पिटलना अपुरा ऑक्सिजन पुरवठा होत असल्याने व्यापार्‍यांकडून ऑक्सीजनचे भाव अव्वाच्या सव्वा वाढवून काळाबाजार सुरु केला आहे. 

याबाबत आय.एम.ए.च्या नगर शाखेने वेळोवेळी प्रशासनाला अवगत करून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व मुबलक करण्याची मागणी केली आहे.

ऑक्सिजनचा पुरवठा असाच कमी होत राहिल्यास अत्यवस्थ रूग्ण ऑक्सिजनअभावी दगावण्याची शक्यता आहे. याला सर्वस्वी जिल्हा प्रशासनच जबाबदार राहिल, असा इशारा आयएमएच्या नगर शाखेने दिला आहे.

याबाबत आयएमएचे अध्यक्ष डॉ.अनिल आठरे, सचिव डॉ.सचिन वहाडणे यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र दिले आहे. ऑक्सिजन पुरवठा कमी असल्याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेही लक्ष वेधण्यात आले होते.

परंतु, त्यानंतरही शहरातील हॉस्पिटलना ऑक्सिजनचा आवश्यक तितका पुरवठा होत नसल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24