बुरुडगाव रोडवरील दिमखादार ‘हॉटेल प्रभा पॅलेस’चे शुक्रवारी उद्घाटन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : सध्याच्या काळात सेवाक्षेत्रात वेगवान बदल होत असून हॉटेलिंग व्यवसायात उत्कृष्ट स्वादाच्या जोडीला सर्वोत्कृष्ट आदरातिथ्य व आधुनिकता वाढत आहे.

नगरमध्ये बुरुडगाव रस्त्यावर नक्षत्र लॉनच्या रुपाने मंगलकार्यासाठी अतिशय दिमाखदार कार्यालय उपलब्ध करून देणार्‍या फुलसौंदर परिवाराने आता हॉटेल प्रभा पॅलेसच्या रुपाने आपल्या व्यवसायाचा नवा आविष्कार साकारला आहे.

बुरुडगाव रोडवर नक्षत्र लॉन जवळ शुक्रवार दि.6 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता हॉटेल प्रभा पॅलेस या भव्यदिव्य पाच मजली दिमाखदार हॉटेलचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

अतिशय लक्झुरियस सेवा, प्रसन्नचित्त शांत, निसर्गरम्य वातावरण, तारांकित दर्जाचे आदरातिथ्य आणि सर्वोत्कृष्ट स्वाद असा अनोखा संगम या नव्या हॉटेलमध्ये साधण्यात आला आहे.

हॉटेल प्रभा पॅलेसची दिमाखदार व देखणी वास्तू नगरच्या वैभवात भर घालणारी ठरेल, असा विश्वास नगरचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर व भिंगार अर्बन बँकेचे संचालक विष्णू फुलसौंदर यांनी व्यक्त केला आहे.

नगरमधील फुलसौंदर परिवाराने पारंपरिक शेती व्यवसाय करताना काळानुरुप नवनवीन व्यवसायात पदार्पण करून ते यशस्वीरित्या चालवले आहेत.

संकल्प कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून या परिवाराने बांधकाम क्षेत्रातही दर्जेदार व विश्वसनीय संस्था म्हणून ठसा उमटवला आहे. याजोडीलाच एम.जी.रोडवर कलासंगम हे रेडिमेड कपड्यांचे दालनही सुरु केले.

यादरम्यान बुरुडगाव रोडवर फुलसौंदर यांनी नक्षत्र लॉन सुरु करून मंगलकार्यासाठी अतिशय उत्तम सोयीसुविधा असलेल्या कार्यालयाची उभारणी केली. अल्पावधीतच नक्षत्र लॉन्सने खूप मोठी लोकप्रियता प्राप्त केली.

या मंगल कार्यालयातून दिली जाणारी आदरातिथ्याची सेवा हॉटेल प्रभा पॅलेसच्या रुपाने आणखी विस्तारीत करण्यात आली आहे. पाच मजली हॉटेल प्रभा पॅलेसच्या दिमाखदार वास्तूतून आपुलकीची स्वाद सेवा व निवाससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भारतातील तसेच जगभरातील हॉटेल इंडस्ट्रीचा अभ्यास करून नगरकरांना अतिशय आनंददायी वातावरणात हॉटेलिंगचा परिपूर्ण आनंद देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात अतिशय आरामदायी बैठक व्यवस्था असलेले टेरेस गार्डन, संपूर्ण वातानुकुलित (ए.सी.) रेस्टॉरंट, मल्टी कुझीन रेस्टॉरंट, रुफ टॉप रेस्टॉरंट, पाहताक्षणी भुरळ पाडेल असा नक्षत्र बँक्वेट हॉल एकत्रित भोजनाचा आनंद व्दिगुणित करेल.

नामांकित इन्स्टीट्युटमध्ये प्रशिक्षण घेतलेला स्टाफ येथे सेवा देण्यासाठी उपलब्ध आहे. हॉटेल प्रभा पॅलेसमध्ये नावाप्रमाणेच राजेशाही मेन्यूही उपलब्ध आहे. अनुभवी शेफच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले स्वादिष्ट पदार्थांची मोठी रेलचेल मेन्यूत आहे.

यात पंजाबी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन मेन्यूसह देश विदेशातील नावाजलेल्या मेन्यूचा समावेश आहे. अतिशय स्वादीष्ट व लज्जतदार चवीतून ग्राहकांची पोटपूजा मनस्वी आनंद देणारी ठरेल, याची काळजी हॉटेल प्रभा पॅलेसने घेतली आहे. कोणत्याही हॉटेलसाठी तेथील पदार्थांची गुणवत्ता व स्वाद अतिशय महत्त्वाचा असतो.

त्यामुळे जेवायला येणारा प्रत्येक ग्राहक मनानेही तृप्त होवूनच परतेल व पुन्हा पुन्हा येईल, अशीच स्वादिष्ट सेवा याठिकाणी मिळणार आहे. संपूर्ण कुटुंबासह, मित्र परिवारासह अतिशय प्रसन्न वातावरणात आनंददायी भोजनाचा आस्वाद सर्वांना घेता येईल.

याशिवाय याठिकाणी बर्थ डे पार्टी, किटी पार्टी, भिशी पार्टी, डोहाळे जेवण, साखरपुडा अशा लहान मोठ्या संस्मरणीय समारंभांचीही खास व्यवस्था असणार आहे. हॉटेल प्रभा पॅलेसमध्ये निवासाचीही तारांकित दर्जाची व्यवस्था आहे. यात डिलक्स रुम्स, सुटसह स्पेशल रुम्स प्रत्येकाचा अधिवास अतिशय आरामदायी करणारा ठरतील.

आदरातिथ्याची नवीन मापदंड हॉटेल प्रभा पॅलेस आपल्या सेवेतून निर्माण करणार आहे. त्यासाठी पूर्णत: प्रशिक्षिक स्टाफची नेमणूक करण्यात आली आहे. निवासाची व्यवस्था करतानाच परगावहून येणार्‍या पाहुण्यांना ऐतिहासिक नगर शहराची ओळख व्हावी, त्यांना येथील ऐतिहासिक वास्तू वैभवाची माहिती होण्यासाठी हॉटेलमध्ये दर्शनी भागात नगरमधील ऐतिहासिक स्थळांची चित्रेही सजावटीच्या रुपात लावण्यात आली आहेत.

यातून ग्राहकांना नगरच्या वैशिष्ट्‌यांची माहिती होवून शहरातील पर्यटनालाही चालना देण्याचा प्रयत्न हॉटेल प्रभा पॅलेसने केला आहे. आपल्या शहराप्रती असलेली आत्मियता व आपुलकी या माध्यमातून व्यक्त करण्याचा अतिशय कौतुकास्पद व आदर्शवत प्रयत्न याठिकाणी करण्यात आला आहे.

नगर शहरातील जुन्या बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेली हि सर्वोत्कृष्ट निवास व्यवस्था नगरमध्ये येणार्‍या पाहुण्यांच्या निश्चितच पसंतीस उतरेल, असा विश्वास अवधूत फुलसौंदर यांनी व्यक्त केला आहे. हॉटेल प्रभा पॅलेसच्या शुभारंभानिमित्त आवर्जून उपस्थित राहत सर्वांनी नगर शहराचा दिमाख वाढवणार्‍या व्यवसायाला शुभेच्छारुपी आशिर्वाद द्यावेत, असे आवाहन फुलसौंदर परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24