अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात एका ३० वर्षीय इसमाने घरात घुसून तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.(crime news)
यावेळी त्या मुलीने आरडाओरडा केला तिचा आवाज ऐकून जवळ असलेल्या तिच्या चुलता मदतीला धावल्याने संबंधित आरोपी पळून गेला.
मात्र त्याला पोलिसांनी जेरबंद करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, पीडित मुलीची आई मजुरी करण्यासाठी शेतात गेली असता पीडित मुलगी घरात एकटीच होती.
दरम्यान सायंकाळी ५ ते ६ चे दरम्यान रोहिदास इधाटे (रा.बेलवंडी बुद्रुक) हा इसम मोटारसायकलवर पीडित मुलीच्या घरासमोर येऊन थांबला व तिला माझा मित्र या भागात कुठे राहतो असे विचारले. यावर तिने मला माहित नाही असे म्हणत घराचा दरवाजा बंद केला.
त्या नंतर रोहिदास हा फोनवर बोलत तिथेच उभा राहून पीडितेला आवाज दिल्याने तिने अर्धा दरवाजा उघडताच त्याने दरवाजा पूर्ण ताकतीने लोटून घरात प्रवेश केला.
दरवाजा बंद करत पीडित मुलीबरोबर अश्लील चाळे करू लागल्याने पीडित मुलीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.आवाज एकून पीडित मुलीचे चुलते ही पळत येऊ लागले हे इधाटे याने खिडकीतून पाहिले आणि खिडकीतून उडी मारून आपल्या मोटारसायकलवरून पळून गेला. पीडित मुलीचे आई वडील घरी आल्यावर घडलेला सर्व प्रकार तिने सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.