Hundai Aura अवघ्या 5 लाख रुपयांपासून सुरु होणार विक्री वाचा फीचर्स आणि बरच काही…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ह्युंदाई ने आपली नवी येणारी कार Hundai Aura चा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. लुकमध्ये हुंडाई कार खूपच छान दिसत असून बातम्या मिळत आहेत की 19 डिसेंबरला चेन्नईच्या महाबलीपुरम मध्ये हीचा रिव्ह्यू होणार आहे. उत्तरादाखल या गाडीची लॉन्चिंग पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होऊ शकते. कंपनी हुंडाई च्या मते Auraची डिझाईन स्पोर्टी आणि प्रोग्रेसिव आहे.
या गाडीच्या डिझाईनवर जर लक्ष दिले तर हे दिसून येते की गाडीचे प्रोपोर्शन, आर्किटेक्चर, स्टायलिंग आणि टेक्नॉलॉजी वर जास्त लक्ष देण्यात आले आहे. आशा आहे की गाडीची किंमत 5 लाख ते 9 लाखांपर्यंत ठेवण्यात येईल.
ही गाडी पुढील वर्षी लॉन्च होणार आहे. तसे पाहता कंपनीने 12 नोव्हेंबर 2019 ला टीज़र रिलीज केला होता. बातम्या मिळत आहेत की कारमध्ये स्टेरिंगला लेदर गुंडाळलेले असेल सोबतच मागील सीट आरामदायी असणार आहे. यामध्ये इंडोअर हँडल सोबतच सी आकारचे हेडलॅम्प आणि पंधरा इंचाचा व्हिल असू शकतो.
Aura भारताची पहिली अशी सेडान असेल जी bs10 टर्बो चार्ज पेट्रोल इंजिन सोबत असणार आहे. यामध्ये नवे डायमंड कट देण्यात आले आहेत. यामध्ये 1.2 लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन मिळणार आहे जे 5 स्पीड मॅन्युअल आणि गिअर बॉक्स सोबत असतील.
ग्रँड आय टेन नियोसशी मिळतोय लुक
स्केच पाहून तर असेच वाटत आहे की ही नवी कार फ्रंट कडून जास्तकरून ग्रँड आय टेन नियोस सारखी दिसत आहे. यामध्येसुद्धा कॅस्कॅडींग फ्रंट ग्रील, इंटिग्रेटेड रेगुलर आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प बसवले आहे. भारतीय बाजारांमध्ये ही कार मारुती डिझायर, होंडा अमेझला टक्कर देऊ शकते. या कारमध्ये ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टीम, वायरलेस चार्जिंग, ऑन ऑफ बटन आणि हाईट ॲडजस्टमेंट सोबत ड्रायव्हर सीट लावलेली असणार आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24