नगर – अनैतिक संबधातून पतीच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यात घडली आहे.
नगर तालुक्यातील महादरा फाटा ते बारदरी रस्त्यावर रमजान शेख यांच्या वस्तीजवळ काल रात्री ८ च्या सुमारास राजाराम बाबुराव दगडखरे, वय ३७ रा. बारदरी पोटेवस्ती, ता. नगर यांना त्याची पत्नी व तिघा आरोपींनी प्रेम संबंधाच्या नाजूक कारणावरुन
तसेच दोन एकर जमीन आरोपी पत्नी सुरेखा राजाराम दगडखैरे हिच्या नावावर करण्याच्या कारणातून लोखंडी रॉड, लोखंडी गज, लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करुन शिवीगाळ करत दमदाटी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या मारहाणीत जबर जखमी झालेले राजाराम दगडखरे यांनी नगर तालुका पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी पत्नी सुरेखा राजाराम दगडखैरे, संतोष काशिनाथ पोटे, काशिनाथ रामभाऊ पोटे, संजना काशीनाथ पोटे, सर्व रा. बारदरी , ता. नगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.