अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-मागील वर्षभरात आमदाराने शहरात एक रुपयाचे विकासकाम केले नाही. मात्र, आमच्या काळात शहराच्या विकासासाठी राज्याच्या तिजोरीतून मोठ्या प्रमाणावर निधी आणला.
त्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. आजही काही विकास कामे चालू आहेत. त्यामुळे माझा विश्वास आहे. नगरपरिषदेवर भाजपची सत्ता येईल, असे प्रतिपादन भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी केले.
येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात भाजपचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून माजी मंत्री व भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे बोलत होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या हस्ते झाले. यावेळी दिलीप भालसिंग, नितीन उदमले, ॲड. अनिल लांडगे, ॲड. राहुल जामदार,
बाळासाहेब महाडिक, अंतू वारूळे, अमजदभाई पठाण, सुभाष गायकवाड, दादा ढवाण, दत्तात्रय जगताप यांनी मार्गदर्शन केले. राम शिंदे म्हणाले, भाजपच्या वतीने राज्यात कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर चालू आहे. नगर दक्षिण जिल्ह्यात पाच ठिकाणी ते घेण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved