मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे; आमदार रोहित पवारांनी दिला शेतकऱ्यांना धीर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले आहे.

शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये पाणी शिरल्याने बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यातच जिल्ह्यासह झालेल्या या पावसाचा कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील फटका बसला आहे.

कर्जत तालुक्यातील अनेक भागात शनिवारी रात्रभर झालेल्या अतिवृष्टी व वादळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार कर्जतला पोहचले होते.

यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला, तसेच शेतकऱ्यांसमवते शेतात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आ. पवार यांनी तहसिलदार,

कृषी अधिकारी यांना दिले. अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र शेतकरी लोकप्रतिनिधी म्हणुन मी आपल्या खंबीरपणे पाठीशी आहे.

आणखी तीन दिवस अतिरिक्त पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने अधिकची काळजी घ्यावी. झालेल्या नुकसानीची महसुल व कृषी विभाग पाहणी करून तात्काळ पंचनामे करतील, असे आमदार पवार म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24