अभिनेता अक्षय खन्नाला खूप कमी वयातच टक्कल पडण्याच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. २० वर्षांच्या एका लिडिंग अभिनेत्याबरोबर घडलेली ही घटना खूपच मोठी होती. केसांचे सातत्याने झडणे अक्षयला मानसिकरीत्या खचविणारे ठरले होते.
अक्षयने पहिल्यांदा आपल्या या समस्येचा उल्लेख केला आहे. बॉलिवूडचा उत्कृष्ट अभिनेता अक्षय खन्ना याला अकाली टक्कल पडले आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये एका लिडिंग तरुण अभिनेत्यासाठी केस झडणे ही खूप मोठी समस्या असते.
अक्षय जेव्हा २० वर्षांचा होता, तेव्हापासूनच त्याचे केस गळण्यास सुरुवात झाली होती. परंतु त्याने आपल्या वास्तव आयुष्यात कधीही आपले टक्कल लपविण्यासाठी कधीही विग वा टोपीचा वापर केला नाही. त्याने याविषयी कधी मीडियाबरोबरही चर्चा केली नाही.
छोट्याशा वयात टक्कलच्या समस्येला तोंड देणाऱ्या अक्षयचा आत्मविश्वास संपत चालला होता, परंतु त्याने आपल्या अभिनयावर काम करणे सोडले नाही.
अक्षय म्हणतो, ‘माझे केस गळण्याची समस्या अगदी तरुण वयात सुरू झाली होती. माझ्याकरिता हे अगदी त्याप्रमाणे होते जसे एखाद्या पियानो वाजविणाऱ्या कलाकाराची बोटे नष्ट व्हावीत व सकाळी उठल्यावर जेव्हा वर्तमानपत्र वाचायला घेतले, तर वाचण्यात अनेक अडचणी निर्माण व्हाव्यात. स्पष्ट दिसण्यासाठी चष्म्याची गरज पडावी.
Web Title – I was mentally disturbed by the collision – Akshay Khanna