कोरोना नसता, तर बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गीही लावले असते

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :-  माझ्या मतदारसंघातील याच नाही, तर बहुतांश रस्त्यांची ही अवस्था आहे. कारण या मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे भाजपचे आमदार होते. याचा जाब खरंतर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता.

मी विकासाचा हा दीर्घ बॅकलॉग भरुन काढण्यासाठी काम करतोय. कोरोना नसता, तर बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गीही लावले असते, असे प्रत्युत्तर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर दिले आहे.

खराब रस्त्यांना कंटाळूनच ते दुरुस्त करण्याची जबाबदारी लोकांनी विश्वासाने माझ्यावर टाकली आणि मी ती पूर्ण करणारच. मी हवेतून पाणी काढणारा किंवा वाघाच्या जबड्यात हात घालणारा नेता नाही,

तर जमिनीवर उतरून काम करणारा, लोकांचा विकास करण्याची शपथ घेऊन ती पाळणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं माझ्या मतदारसंघाची चिंता आपण करू नका, असा टोलाही पवार यांनी पडळकरांना मारला.

राहिला प्रश्न साहेबांच्या खांद्यावर बसण्याचा. साहेब हे आमचे नेते, मार्गदर्शक आणि सर्वेसर्वा आहेत आणि त्याचा मला अभिमानही आहे,

पण मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडं लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात असं मी विचारणार नाही, पण आतातरी आहात त्याच ठिकाणी राहिलात, तरी आपल्यावरील लोकांचा विश्वास नक्की वाढेल. त्यासाठी आपण जरूर प्रयत्न करा, असे पवारांनी नमूद केले. मित्र म्हणून आपल्याला शुभेच्छा.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24