अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करून हॉटेल परवाना रद्द करेल, अशी धमकी देत तीन लाखांची खंडणी मागणाऱ्या हिंदू राष्ट्र सेनेच्या दिगंबर गेंट्याल याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रंगेहात अटक केली.
तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांना उत्पादन शुल्क विभागाने दारु विक्रीचा रितसर परवाना दिला आहे. गेंटयाल याने परवान्याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती घेत त्या आधारावर परवाना नियमानुसार मिळाला नसून त्यात अनेक त्रुटी आहेत.
उत्पादन शुल्कच्या वरिष्ठांकडे तक्रार करुन तुझा परवाना रद्द करतो, अशी धमकी गेंट्यालने दिली होती. वारंवार फोन करुन, समक्ष भेटून तीन लाखाची मागणी तो करत होता.
तक्रारदाराने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्याकडे अर्ज दिला. सापळा रचून गेंट्यालला एक लाखाची खंडणी घेताना रंगेहात अटक केली. कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेंटयालच्या विरोधात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेंट्यालसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती कोणत्याही कारणासाठी खंडणी मागत असतील किंवा इतर प्रकारचा त्रास देत असतील, तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews