शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यास रस्त्यावर उतरू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :- पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील शेतकऱ्यांचे संपूर्ण विजबिल माफ करावे व शेतकऱ्यांचे वीजजपंपाचे कनेक्शन तोडू नये तसेच शेतकऱ्यांना मोफत वीज द्यावी.

या विषयाचे निवेदन राष्ट्रीय शेतकरी युनीयनच्या वतीने पाथर्डी तहसीलचे नायब तहसीलदार एस.टी. माळी यांना देण्यात आले आहे.

दरम्यान या निवेदनात म्हंटले आहे कि, अनेक वर्षानंतर चालु वर्षी चांगला पाऊस पडला व पिके चांगली आली परंतु महावितरण कंपन्याचे कर्मचारी शेतकऱ्यांना विजपंपाचे बील भरा अन्यथा तुमचे वीज पंपाचे कनेक्शन तोडू अशा धमक्या देत आहेत.

तसेच काही गावाचे कनेक्शन बंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला पिकांचा घास तर जाणार नाही ना? यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून धास्तावलेला आहे.

आर्थिक घडी विस्कटलेल्या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना साथ द्यावी. तसेच शेतकऱ्यांचे शंभर टक्के वीज बील माफ करुन शेतकऱ्यांचे वीजपंपाचे कनेक्शन तोडू नये असा आदेश काढावा. अन्यथा राष्ट्रीय शेतकरी युनीयन रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24