अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर ;- शहरातील नेप्ती नाका परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्ष वयाच्या कॉलेज तरुणीस लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबात सविस्तर माहिती अशी कि, आरोपी गोवर्धन गोरख पालवे याने लॉज नेवून पिडीत तरुणीवर बळजबरी करुन शरीर संबंधाची मागणी केली व इच्छेविरुद्ध बलात्कार केला.
तसेच पिडीत तरुणीचे आरोपी गोवर्धन गोरख पालवे याने त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढून सदर तरुणीस ब्लॅकमेल केले.
तू मला वेळोवेळी सेक्स करुन दिला नाही तर तुझे हे फोटो व्हायरल करील, अशी धमकी दिली व तरुणीने प्रतिकार करताच तिला मारहाण करून धमकावले व बलात्कार केला.
हा प्रकार २४ एप्रिल ते २८ डिसेंबर २०१९ दरम्यान घडला . पिडीत तरुण विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिसात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान तोफखाना पोलिसांनी गोवर्धन गोरख पालवे या आरोपीला अटक केली आहे.