मला विधानपरिषदेसाठी संधी दिल्यास सोने करील: राम शिंदे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गेले दहा वर्षांत केलेले काम व विशेषतः पाच वर्षे जलसंधारणाच्या खात्यामार्फत केलेले काम व माझ्या कामाचा अनुभव पाहता पक्षनेतृत्वाने आगामी राज्यसभा अगर विधानपरिषदेसाठी संधी दिल्यास त्याचा फायदा जिल्हा व राज्यासाठी करून दिलेल्या संधीचे सोने करील, अशी भावना माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्‍त केली. प्रा. शिंदे तालुक्‍याच्या दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

शिंदे म्हणाले, भाजप व मित्रपक्षांचे विधानसभा सदस्य संख्या पाहता राज्यसभेच्या तीन जागा व विधानपरिषदेच्या चार जागा भाजपच्या वाट्याला येऊ शकतात. मी गेल्या दहा वर्षात केलेले काम व विशेषतः पाच वर्षे मंत्री म्हणून जलयुक्त शिवार अभियानचे चांगले काम केले. राज्यभरात त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एका मोठ्या बड्डे घराण्याशी लढा देताना माझा कर्जत – जामखेड मतदारसंघात पराभव झाला.

या सगळ्या पार्श्वभूमिवर मी केलेले काम व माझ्या कामाचा अनुभव पाहता पक्षनेतृत्वाने संधी दिल्यास मी चांगल्या पद्धतीने काम करील. परंतु हा निर्णय पक्षनेतृत्वाने करायचा आहे. नव्यानेच प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड झाली.

ते व विरोधी पक्षनेते आहे, कोअर कमिटी आहे. केंद्राचे नेतृत्व आहे ते जे निर्णय घेतील. तो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मान्य राहील जर मला संधी मिळाली तर जिल्ह्यासाठी त्याचे सोने करण्याचा माझा प्रयत्न राहील.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24