पर्यटनासाठी `इथे` गेलात तर होणार गुन्हे दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-   जिल्ह्यातील पर्यटकांसाठी विशेष आकर्षण असलेले मांडओहोळ धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

पारनेर तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पोलिस प्रशासनाने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार जमावबंदी लागू केली आहे.

यामुळे धरण परिसरात पर्यटकांना नो एन्ट्री आहे. या निर्णयाची पर्यटकांनी दखल घ्यावी यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी धरण परिसरात फिरणार्‍या 15 पर्यटकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

मांडओहोळ धरण परिसरातील रूईचोंडा धबधबा परिसरात मोठ्या प्रमाणावर तालुक्यातील व जिल्ह्यातील पर्यटक येत असतात.

या ठिकाणी येणार्‍या पर्यटकांवर कोरोना प्रादुर्भावामुळे कारवाई केली जाणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले. पर्यटनासाठी वरदान ठरलेले मांडओहोळ धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

यामुळे जिल्ह्यासह तालुक्यातील पर्यटकांचे पाय धरणाकडे वळू लागले आहेत. कोरोनाच्या काळात पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यासाठी परवानगी नाही. मात्र, परिसरात अनेक लोक चारचाकी व दुचाकीवरून आनंद लुटण्यासाठी येत आहेत.

नागरिकांच्या सुरक्षितता व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी थेट कारवाईचा इशारा सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार भालचंद्र दिवटे, सत्यजित शिंदे, सुरज कदम यांनी दिला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24