अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर हिवरगाव पावसा टोलनाक्यावर अवैधरित्या दारूची वाहतूक करणारी पिकअप पकडण्यात आली आहे.
दरम्यान हि कारवाई पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईत एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे नाशिक महामार्गावर अवैधरीत्या दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती पुणे येथील उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विभागीय पथकाचे अधिकारी दिगंबर शेवाळे यांना समजली.
माहिती समजताच पोलीस पथकाने या गाडीचा पाठलाग करून सदर गाडी हिवरगाव पावसा टोल नाक्यावर पकडण्यात आली. या गाडीची तपासणी केली असता दारूचे 28 बॉक्स जप्त करण्यात आले.
सुमारे एक लाख 87 हजार रुपयांचा माल व एक बोलेरो पिकअप असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल पुणे येथील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केला आहे.