अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- राज्य शासनाने लॉकडाऊनमुळे अहमदनगर जिल्हयात व राज्यामधील इतर जिल्हयांमध्ये वा इतर राज्यामध्ये अडकलेल्या स्थलांतरीत मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना त्यांचे वास्तव्याच्या मुळ ठिकाणी परतण्यासाठी आदर्श कार्यपध्दती निश्चित केली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या व्यक्तीसाठी सोयीचे व्हावे यासाठी https://covid19.mhpolice.in लिंकद्वारे माहिती भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास त्यांच्या मदतीसाठी जिल्ह्यात पदसिध्द नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अहमदनगर जिल्हयामध्ये बाहेरुन येणा-या व्यक्तींसाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील यांची तर जिल्हयातून बाहेरच्या जिल्हयामध्ये जाणा-या व्यक्तींसाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पथक क्रमांक 1 – अहमदनगर जिल्हयामध्ये बाहेरुन येणा-या व्यक्तींसाठी – नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील (मो.9763739974), सहाय्यक नोडल अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेचे तहसीलदार महेश पवार ( मो. 8956799922), करमणूक कर शाखा नायब तहसीलदार सुनिल पाखरे (मो. 9309881788)
व पुनर्वसन शाखा अव्वल कारकून अमोल झोटींग (मो. 9922426717), कुळकायदा शाखा अव्वल कारकून शेखर साळूंके (मो.9881119866)आणि सं.गा.यो. शाखा लिपीक भगवान सानप (मो.9130836918) असे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहेत.
पथक क्रमांक 2- अहमदनगर जिल्हयातून बाहेरच्या जिल्हयामध्ये जाणा-या व्यक्तींसाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील ( मो.9130799939), सहाय्यक नोडल अधिकारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील (मो.7020739411), महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक विजय गिते (मो.9403709123),
निवडणूक तहसीलदार चंद्रशेखर शितोळे (मो.9881304874) गृह शाखा नायब तहसीलदार राजू दिवाण (मो.9890929510) व निवडणूक शाखा अव्वल कारकून राजेंद्र शिंदे (मो. 7588543715), करमणूक कर शाखा अव्वल कारकून संदेश दिवटे (मो.7020945296) आणि ग्रामपंचायत शाखा लिपीक प्रवीण कांबळे (मो.7020360085) असे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®