अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- शौर्य दिनानिमित्त कोरेगाव-भीमा येथे उसळणाऱ्या जनसमुदायाच्या पार्श्वभूमीवर पुणे-नगर महामार्ग दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
31 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2021च्या रात्री 12 वाजेपर्यंत हा महामार्ग बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
कोरेगाव-भीमा शौर्य दिनानिमत्त कोरेगाव-भीमा येथे दरवर्षी 1 जानेवारी रोजी हजारो भीम अनुयायी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड गर्दी उसळते.
सध्या राज्यात सुरू असलेला संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
शौर्य दिनाच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडून त्याचा भीम अनुयायांनाच धोका होऊ शकत असल्याने खबरादारीचा उपाय म्हणून 31 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2021च्या रात्री 12 वाजेपर्यंत पुणे-नगर महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.