अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : अहमदनगर महानगपालिका आयुक्तांनी नगर शहरातील तोफखाना व सिद्धार्थनगर भागात सर्वाधिक रुग्ण आढळल्याने महापालिकेने दोन्ही परिसर १० जुलैपर्यंत हॉटस्पॉट क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत, तसेच नालेगाव परिसर ८ जुलैपर्यंत हॉटस्पॉट घोषित केला आहे.
नालेगाव परिसर – या हॉटस्पॉट परिसरात दिल्लीगेट वेस, चौपाटी कारंजा, जाधव हॉस्पिटल, सजावट कारपेटवाला, जनकल्याण रक्तपेढी, वाघगल्ली, गाडगीळ पटांगण, अंतिम चौक अमरधाम, नेप्ती नाका चौक, नालेगाव हडको, घोरपडे हॉस्पिटल, दिल्लीगेट याचा समावेश असून
बफरझोनमध्ये – रंगारगल्ली, आनंदीबाजार, गौरीघुमट, धनगरगल्ली, पटवर्धन चौक, जुने जिल्हा न्यायालय, टांगेगल्ली, अमरधाम, दातरंगे मळा, बागरोजा हडको, सातभाई मळा, नीलक्रांती चौक या परिसराचा समावेश आहे.
सिद्धार्थनगर परिसर – या हॉटस्पॉटमध्ये बालिकाश्रमकडून सिद्धार्थनगरकडे पूर्वेकडील रस्त्यावर येणाऱ्या श्रीनिवास किराणापासून उत्तरेकडे जाणारा रस्ता, गोळीबार मैदान, सार्वजनिक शौचालय, सारडा कॉलेजकडील दक्षिणेकडील भिंत, सारडा कॉलेज कॅंन्टीन,
अप्पू हत्ती चौक, गुरूकुल शिक्षण मंडळ इमारतीच्या उत्तरेकडील भिंत, पश्चिमेकडील लॉर्डसन किराणा स्टोअर्स, दीपक मोहिते यांचे घर, शिवनेरी मंडळ, गणेश चौक,
गणेश राणा घर चाळ नंबर दोन, महेश रोकडे यांचे घर चाळ नंबर तीन, शिवदास घोरपडे, अशोक उमाप ते श्रीनिवास किराणा स्टोअर्स परिसराचा आणि
बफर झोनमध्ये जाधव मळा, कवडे नगर, सारडा कॉलेज, मिसगर चाळ, रेणावीकर बिल्डिंग, स्वास्थ्य हॉस्पिटल, म्युन्सिपल वसाहत, करंदीकर हॉस्पिटल, वाघ मळा, सुडके मळा, गंधे मळा याचा समावेश आहे.
तोफखाना- या हॉटस्पॉटमध्ये सिद्धीबाग कोपरा, तोफखाना रस्ता, शितळा देवी मंदिर, लयचेट्टी यांचे घर, बागडपट्टी रस्ता, बागडे ज्वेलर्स, जगदीश भुवन, चितळे रोड, नेहरू मार्केट, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट, दत्त मंदिर ते सिद्धीबाग कोपरा याचा आणि
बफर झोनमध्ये सिद्धीबाग, नवरंग व्यायाम शाळा, सीताराम सारडा हायस्कूल, बागडपट्टी, लोणारगल्ली, जुने सिव्हील हॉस्पिटल, तेलीखुंट पॉवर हाऊस, बाई इचरजबाई शाळा, गांधी मैदान, लक्ष्मीबाई कारंजा, पटवर्धन चौक, रंगारगल्ली या परिसराचा समावेश आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews