अहमदनगर जिल्ह्यात आज ३८५ रुग्ण बरे होऊन परतले घरी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३८५ रुग्ण बरे होऊन परतले घरी.

  • मनपा १८९
  • संगमनेर ३१
  • राहाता १४
  • पाथर्डी २५
  • नगर ग्रा.२४
  • श्रीरामपूर २९
  • कॅन्टोन्मेंट १३
  • नेवासा २४
  • श्रीगोंदा २
  • पारनेर ८
  • अकोले २
  • शेवगाव २
  • कोपरगाव ३
  • कर्जत १९
  • बरे झालेले एकूण रुग्ण:४९३५

कोरोनाला गांभीर्याने न घेणार्‍यांना कळकळीचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोना संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे सध्या सात हजारहून अधिक रुग्ण नगर जिल्ह्यात झाले आहेत या सर्वात महामारीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर, आरोग्य कर्मचारी लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. शहरातीलच एका खासगी हॉस्पिटलमधील 26 वर्षीय युवा डॉक्टरचाही करोनाने मृत्यु झाला आहे. 

सध्या सोशल मिडियावर करोनाबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. करोना साधा सर्दीचा आजार आहे, काही काळजी करायची गरज नाही, अशा स्वरुपाच्या पोस्ट व्हायरल होत असल्या तरी प्रत्यक्षात करोनाचे संकट खूप मोठे आहे. 

प्रत्येकाने गांभीर्याने करोनाबाबत दक्ष राहून काळजी घेण्याची गरज आहे, असे मत नगरमधील साई एशियन हॉस्पिटलचे डॉ.किरण तुपे यांनी व्यक्त केले आहे. सध्या डॉ.तुपे यांची एक पोस्ट सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली असून करोनाची वस्तुस्थिती मांडत त्यांनी कोरोनाला गांभीर्याने न घेणार्‍यांना कळकळीचे आवाहनही केले आहे.

डॉ.किरण तुपे यांची व्हायरल झालेली पोस्ट मित्रांनो, 

अतिशय दुःखद घटना, आमचा अतिशय गुणवान मित्र एका खासगी हॉस्पिटल मध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होते. काम करत असताना एका कोरोना पेशंटने व्यवस्थित माहिती न दिल्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा झाली, त्यानंतर कोरोना, न्युमोनिया झाला, दम लागायला लागला. तातडीने सर्व उपचार सुरू केले. 25-30 दिवसांपासून ते ऍडमिट होते. सर्व यंत्रणा त्या युवा डॉक्टरला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. परंतु उपचार चालू असताना दिनांक 04/08/2020 रोजी रात्री 10 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली…

हा युवा डॉक्टर बाप होणार होता, त्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचे होणारे बाळाचे जन्माच्या अगोदरच बाळाचे बापाचे छत्र हरवले. सुरुवातीला सरकारकडून चूक झाली, आता जनता चूक करत आहे. नगर जिल्ह्यामध्ये एकही पेशंट नसताना आज साडेतीन ते चार हजाराच्या आसपास पेशंट झालेत , हे फक्त काही विघ्नसंतोषी लोक,  मूर्ख लोक,  काही संघटना , काही पक्ष, काही लोक राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी प्रतिष्ठेसाठी वेगवेगळे कार्यक्रम करतात त्यातून करोना पसरवला जातो आहे…

कुठलाही पेशंट आला आणि त्याला विचारलं कि ताप होता का? सर्दी खोकला होता का ? त्याचे उत्तर असते (खोटे बोलतो) तसं काही नाही तसं काही नाही आम्ही कुठे गेलोच नाही आमच्याकडे कोणी पाहुणे आलेच नाही आम्ही कुठल्या कार्यक्रमाला गेलो मग खरं खरं सांगतात कि अमक्या तमक्या च्या वाढदिवस ला गेलो होतो, त्याचा वाढदिवस होता, सासरवाडी गेलो होतो , बहिणीकडे गेलो होतो, अमक्या तमक्याची पार्टी होती, मित्राकडे गेलो होतो.

तोपर्यंत पेशंटने सर्वांना कोरोनाचा प्रसाद सर्वांना  दिलेला  असतो , मित्रांनो,  पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो कि अर्जंट कामाशिवाय बाहेर पडू नका , सोशल डिस्टन्सींगचे  पालन करा, हात वारंवार धुवा, कुणालाही कोरोणा देऊ नका , कुणाचाही कोरोणा घेऊ नका, सार्वजनिक कार्यक्रमात जाऊ नका, पार्ट्या करू नका, संघटनेचे काम सध्या दूर ठेवा , सध्या राजकारण दूर ठेवा ,

आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या तसेच सरकारी यंत्रणेत कोरोना साठी काम करणार्‍या लोकांचा बळी घेऊ नका तसेच तुमच्या घरातील लोकांचा बळी घेऊ नका. प्रिय मित्र डॉ प्रशांत, तू माझ्याबरोबर  साई एशियन हॉस्पिटल ला दोन वर्ष अगोदर काम केले आहे तुझ्या बरोबरची मैत्री कायम ध्यानात राहील , तुला माझा सलाम आहे, तू कोरोना पेशंट साठी काम करता करता लढला , त्यात तू शहीद झाला… तुला सर्व आपल्या मित्र परिवारातर्फे सलाम व जय हिंद…

– डॉ किरण तुपे आय सी यु रजिस्ट्रार व इन्चार्ज, साई एशियन हॉस्पिटल, अहमदनगर

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24