अहमदनगर जिल्ह्यात २४ तासांत कोरोनाचे ५३५ नवे रुग्ण,सहा जणांचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात २४ तासांत कोरोनाचे ५३५ नवे रुग्ण आढळून आले. मागील पाच महिन्यांत सर्वाधिक रुग्ण प्रथमच शनिवारी आढळले.

त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५५०८ झाली आहे. जिल्ह्यात आणखी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे बळींची एकूण संख्या ७४ झाली आहे. नगर शहरात १४ मार्चला पहिला रुग्ण आढळून आला होता.

मार्च, एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यात केवळ २२८ पॉझिटिव्ह आढळले होते. २१ जूनपासून मात्र जिल्ह्यातील रुग्णांची संख्या सातत्याने वाढत गेली.

२१ जून ते १ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात चार हजारांहून अधिक रुग्ण आढळले. गेल्या बुधवारी जिल्ह्यात सर्वाधिक ४२८ रुग्ण आढळून आले होते त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी सहापासून ते शनिवारी सायंकाळी सहापर्यंत ५३५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे
        क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24