अहमदनगर जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम वादळी पावसाने १ व्यक्ती मृत्युमुखी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : निसर्ग चक्रीवादळाने निर्माण झालेल्या वातावरणाचा परिणाम अहमदनगर जिल्ह्यातही जाणवला.

जिल्ह्याच्या काही भागात वादळी पावसाने नुकसानीच्या घटना घडल्या तर अकोले तालुक्यातील लहित बुद्रुक येथील ३२ वर्षीय व्यक्ती घराची भिंत अंगावर पडून मृत्युमुखी पडली.

जिल्हा प्रशासनाने तात्काळ यासंदर्भातील प्राथमिक माहिती मागवली. यात काही ठिकाणी घरे पडण्याच्या आणि जनावरे दगावण्याच्याही घटना घडल्या.

दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. निसर्ग चक्रीवादळाच्या परिणामामळे अकोले तालुक्‍यातील लहित बु. येथील सागर पांडुरंग चौधरी (वय ३२) ही व्यक्ती मृत्युमुखी पडली.

तसेच 4 व्‍यक्‍ती जखमी झालेल्‍या आहे. नगरमध्‍ये आणि संगमनेरमध्‍ये प्रत्‍येकी एक आणि शेवगावमध्‍ये दोन व्‍यक्‍ती जखमी झालेल्‍या आहेत. याशिवाय, काही ठिकाणी जनावरे दगावण्याच्या घटनाही घडल्या.

यांत अकोले ४, कोपरगाव १, नेवासा १, पारनेर ५, संगमनेर ७, श्रीरामपूर २, राहाता ३ अशी २३ जनावरे मृत्युमुखी पडली. जिल्‍ह्यातील ३० कच्च्या प्रकारच्या घरांचे नुकसान झाले. यात, संगमनेरमध्ये सर्वाधीक १० घरांचे नुकसान झाले.

तसेच, कर्जत ०१, कोपरगाव ०९, नेवासा ०२ आणि राहुरी ०८ असे कच्च्या घरांचे नुकसान झाले. तर अंशतः कच्‍ची असलेल्‍या 708 घरांचे नुकसान झालेले आहे.

यांत नगर ०३, अकोले ४५, कर्जत ०३, कोपरगाव १०, नेवासा-०८, पारनेर ४४, पाथर्डी १०, राहुरी १७, संगमनेर ५३१, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर १८ आणि राहाता ०६ असे नुकसान झाले.

जिल्‍ह्याच्या विविध भागातील 23 झोपड्यांचेही नुकसान झाले. याशिवाय, १०० टक्के पक्की घरे असलेल्यांमध्ये राहुरी आणि संगमनेर येथील प्रत्येकी ०२ घरांचे तर अंशता पक्की असलेल्या घरांमध्ये अकोले ०८, कोपरगाव ०२, नेवासा ०२, राहुरी ०५, संगमनेर ०४ आणि शेवगाव ०१ असे एकूण २२ घरांचे नुकसान झाले.

या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील 632.3 हेक्‍टर शेतीपिकाचेही नुकसान झाले. यामध्ये कोपरगाव- ३.४ हेक्टर, नेवासा २.६, पारनेर ५४०, पाथर्डी ७६, श्रीगोंदा ९.५ आणि श्रीरामपूर ०.८ हेक्टर.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24