अहमदनगर :- जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. गेल्या २६ दिवसांत २४ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या नगरच्या बूथ हॉस्पिटलमध्ये १२ जणांवर उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी आणखी चार रुग्णांना १४ दिवसांच्या उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. दरम्यान, गुरुवारी रात्री जामखेडमध्ये कोरोनाचा आणखी एक, तर शुक्रवारी दोन रुग्ण आढळून आले.
त्यामुळे जामखेडमध्ये बाधित रुग्णाची संख्या १४, तर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ४० झाली आहे. गेल्या चोवीस २४ तासांत ९ नवे रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काही रुग्ण आढळून आले. त्यानंतर मात्र संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. गुरुवारी नगर जिल्ह्यात प्रथमच सर्वाधिक ७ रुग्ण आढळून आले.
त्यात संगमनेरचे ४, तर जामखेडचे ३ रुग्ण होते. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण नगर जिल्ह्यात मोठे आहे. गेल्या २६ दिवसांत जिल्ह्यात २४ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.
बाराजणांवर बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या बूथ हॉस्पिटलमध्ये जामखेड येथील ५, नेपाळहून संगमनेर येथे आलेले ४, नेवासे येथील २ आणि एक परदेशी असे १२ रुग्ण उपचार घेत आहेत.
शनिवारी आणखी दोघांना बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे ही संख्या १४ होणार आहे.पहिला रुग्ण २९ मार्चला सोडण्यात आला. दुसरा रुग्ण ३ एप्रिलला सोडण्यात आला.
तिसरा रुग्ण ९ एप्रिलला सोडण्यात आला. १९ एप्रिलला आठ रुग्णांना सोडण्यात आले. २० एप्रिलला सहा रुग्णांना सोडण्यात आले. २२ एप्रिलला दोन रुग्णांना सोडण्यात आले व २४ एप्रिलला आणखी दोन रुग्णांना सोडण्यात आले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®