‘त्या’ नराधमाचा क्रूर चेहरा समोर…मुलाला सुरीचा धाक दाखवून मारहाण करत अनैसर्गिक अत्याचार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- शहरातील रेल्वे स्टेशन येथे समोसा विकणाऱ्या मुलावर एका नराधमाने अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणाबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय.  

मुलाने विरोध केल्यानंतर त्याच्या अंगाचे चावे घेऊन त्याला जखमी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. 

रेल्वे स्टेशन येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पत्तीस ते चाळीस वर्षांची एक व्यक्ती मुलाला बरोबर घेऊन जात असल्याचे दिसत आहे. त्यानुसार आरोपीचा शोध सुरू आहे.

शनिवारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. 

पीडित मुलगा रेल्वे स्टेशन येथे समोसा विक्री करायचा शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास एक व्यक्ती या मुलाकडे आला. शंभर रुपयांचे समोसे विकत घ्यायचे असल्याचे सांगून मुलाला रेल्वे स्टेशन परिसरात नेले. 

त्या ठिकाणी त्याच्या अत्याचाराचा प्रयत्न केला. परंतु, मुलाने विरोध केल्यानंतर आरोपी मुलाला सुरीचा धाक दाखवून त्याला मारहाण करून केडगाव देवी रोडकडे घेऊन गेला. 

त्या ठिकाणी अत्याचाराचा प्रयत्न करत असताना मुलाने विरोध केलानंतर आरोपी त्याच्या शरिरावर अनेक ठिकाणी चावा घेऊन त्याला जखमी केले. 

तब्बल तीन तास आरोपी मुलावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर मुलगा आरोपीच्या तावडीतून सुटून रेल्वे स्टेशनला आल्यानंतर त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24